नमस्कार! गोष्टरंगच्या फेलोशिप २०२३-२४ च्या निवड प्रक्रियेत आपलं स्वागत आहे.
‘गोष्टरंग’ हा क्वेस्ट या सामाजिक संस्थेच्या वाचनलेखन समृद्धी कार्यक्रमातील एक अभिनव उपक्रम आहे. ग्रामीण आणि आदिवासी विभागात वाचन संस्कृती अजूनही म्हणावी तशी रुजलेली नाही. अशा भागातल्या मुलांसाठी बालसाहित्यातल्या किंवा मुलांच्या पुस्तकांतल्या गोष्टी सादर केल्या, तर त्यांना वाचन–लेखनाची ओढ वाटू शकेल या अपेक्षेने क्वेस्टने २०१६ मध्ये ‘गोष्टरंग’ हा कार्यक्रम सुरू केला. गोष्टरंग फेलोशिपच्या आतापर्यंत ०५ बॅचेस झाल्या आहेत आणि २३ व्यक्तींनी ही फेलोशिप पूर्ण केली आहे.