गोष्टरंग फेलोशिप २०२६-२७

निवड प्रक्रिया कशी असेल?
प्राथमिक फेरी – अर्जदारांनी गूगल फॉर्म भरायचा आहे. आलेल्या अर्जांतून मुलाखतीसाठी काही व्यक्ती शॉर्टलिस्ट केल्या जातील. 
अंतिम फेरी – मुलाखतीसाठी १ दिवसीय कार्यशाळा होईल. कार्यशाळेबद्दलची अधिक माहिती निवड झालेल्यांना कळवण्यात येईल. कार्यशाळेनंतर अंतिम निकाल जाहीर केला जाईल.

फेलोशिपसाठी माझी निवड झाल्यास, मला संपूर्ण कालावधीत सोनाळे येथे राहावे लागेल का?
होय, तुम्ही फेलोशिपच्या संपूर्ण कालावधीसाठी सोनाळे (तालुका वाडा, जिल्हा पालघर) येथे राहाल. क्वेस्टचे प्रकल्प महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये सुरू आहेत. तिथेही गोष्टी सादर करण्यासाठी काही दिवस जावे लागेल. दिवाळीची ५ ते ६ दिवसांची सुट्टी असेल, तेव्हा घरी जाता येईल. फेलोशिपच्या सुरुवातीला कॅलेंडर तुमच्यासोबत शेअर केले जाईल.

फेलोशिप दरम्यान माझ्या राहण्याची, जेवण्याची आणि प्रवासाची  काय व्यवस्था असेल?
सोनाळे गावातल्या घरांमध्ये फेलोजची भाड्याने राहण्याची सोय केली जाईल. या घरांमध्ये प्राथमिक स्वरूपाच्या सुविधा असतील. राहण्याच्या जागेची व्यवस्था आणि त्याचा खर्च QUEST द्वारे केला जाईल.

जेवणाचा खर्च फेलोजना करावा लागेल. क्वेस्ट सोनाळे सेंटरमधील मेसमध्ये जेवण (सकाळचा नाश्ता, दुपारचे जेवण, रात्रीचे जेवण) रु.४,०००/- प्रति महिना भरून उपलब्ध आहे. फेलोज त्यांच्या फेलोशिप रकमेतून या सुविधेसाठी पैसे देऊ शकतात.

फेलोशिपदरम्यान होणाऱ्या गोष्टरंगच्या कार्यक्रमांसाठी प्रवासखर्च तसेच मुलाखतीसाठी येण्याजाण्याचा प्रवास खर्च संस्थेतर्फे केला जाईल.

सोनाळे गावामध्ये काय सुविधा उपलब्ध आहेत?
तुम्ही फेलोशिपदरम्यान सोनाळे या गावात मुख्यतः राहणार आहात. सोनाळे हे गाव वाडा तालुक्यातील (पालघर जिल्हा) आदिवासी भागात आहे. हे गाव तालुक्याच्या ठिकाणापासून साधारण १२ किलोमीटर अंतरावर असून तिथे मर्यादित सुविधा उपलब्ध आहेत. गावात एक प्रायव्हेट दवाखाना आणि प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. एक लहान भाजी मार्केट ६ किमी अंतरावर तिळसे या गावी आहे. हॉस्पिटल, मार्केट, एटीएम इत्यादी सुविधा वाडा या तालुक्याच्या ठिकाणीच उपलब्ध आहेत. तिथे जाण्यासाठी शेअर जीप गावात मिळते.

गोष्टरंगचे कार्यक्रम कुठे होतात?
गोष्टरंगचे प्रयोग पालघर जिल्ह्यातील विविध गावांमधल्या जिल्हा परिषदेच्या शाळा किंवा आश्रम शाळांमध्ये होतात. ही गावं सोनाळ्यापासून साधारण ५ किमी ते ६० किमी एवढ्या अंतरात कुठेही असू शकतात. हा संपूर्ण भाग प्रामुख्याने आदिवासी वस्तीचा आहे. प्रयोगांसाठी दर वेळेला चांगली खोली किंवा हॉल मिळेलच असे नाही.

क्वेस्टचे प्रकल्प महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांत चालू आहेत, उदा. रायगड, हिंगोली, गडचिरोली वगैरे. तिथेही प्रयोगांचे काही दौरे आखले जातील. त्या गावांत टीमसोबत राहावे लागेल. काही निवडक प्रयोग मुंबई-पुणे अशा शहरांमध्येही होऊ शकतात.

स्टायपेंडबद्दल अधिक माहिती मिळू शकेल का ?
दर महिना रु.२५,०००/- स्टायपेंड दिला जाईल. निवड झाल्यानंतर काही कारणास्तव ही फेलोशिप अर्ध्यातच सोडावी लागली तर तोपर्यंत मिळालेली रक्कम संस्थेला परत करावी लागेल.

या फेलोशिपनंतर काय?
तुम्ही आपल्या गावी जाऊन मुलांसोबत काम करू शकता, किंवा शाळांमध्ये जाऊन मुलांसाठी किंवा शिक्षकांसाठी नाट्यविषयक कार्यशाळा घेऊ शकता. गोष्टरंगचे २०१८-१९ या वर्षातले फेलोज कल्पेश समेळ आणि प्रतीक्षा खासनीस यांनी स्वतःची Tiny Tales ही संस्था सुरू केली आहे. तसेच गोष्टरंगच्या २०२३-२४ च्या बॅचमधील ऋषिकेश प्रधान आणि हर्षा शर्मा यांनी स्वतःची Chali Kahani व दामिनी जाधव हिने Katti Batti या संस्था सुरू केल्या आहेत. आणि ते महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागात अशा प्रकारचं काम करतात. शिवाय QUEST च्या इतर प्रकल्पांसाठी जर काही प्रयोग ठरले, तर तुमच्या उपलब्धतेनुसार त्यात सहभागी होता येईल.

याबद्दल काही प्रश्न असल्यास कुणाशी संपर्क करायचा ? 
महेंद्र वाळुंज | mahendra.walunj@quest.org.in | +91 9890837009
देवदास उचले | devdas.uchale@quest.org.in | +91 9657442957

लक्षात ठेवण्याच्या महत्त्वाच्या तारखा कोणत्या ?

अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख २८ फेब्रुवारी २०२६ आहे.

मुलाखतीसाठी निवडलेल्यांना ०५ मार्च २०२६ पर्यंत कळवण्यात येईल.

मुलाखतीसाठी दिवसीय कार्यशाळा २ आणि ३ एप्रिल २०२६ रोजी होईल. कार्यशाळेबद्दलची अधिक माहिती निवड झालेल्यांना कळवण्यात येईल.

फेलोशिपसाठीजणांची निवड १० एप्रिल २०२६ ला जाहीर होईल.

फेलोशिप आणि निवासी कार्यशाळेची सुरुवात १५ जून २०२६ ला होईल.

हा फॉर्म भरायला तुम्हाला सोयीचं जावं यासाठी खाली नमूद केलेल्या गोष्टी तयार ठेवा.

१. तुमचा Bio Data हा PDF स्वरूपात असायला हवा.

२. तुमच्या दृष्टीने तुम्ही आजवर केलेलं कोणतंही महत्त्वाचं एक नाटक, शॉर्टफिल्म, सिरिअल, नाट्यस्पर्धा, युवा महोत्सवातलं नाटक, एकांकिका इ. याबद्दलची माहिती.
उदाहरणार्थ –
काम –
नाटक – कावळ्यांची शाळा
माझं नेमकं योगदान –
रागरंग या संस्थेने निर्मिती केलेल्या या दोन अंकी नाटकात प्रकाशयोजनेची जबाबदारी पार पाडली. नाटकासाठी एकूण ६ फ्रेनल, ८ पारलाईट व ३ प्लेनोकॉनवेक्स लाईट यांचा वापर केला.  प्रयोग पुणे, मुंबई व इंदौर येथे झाले. नाटकाला जिल्हास्तरीय नाटक स्पर्धेत दिग्दर्शनाचे पहिल्या क्रमांकाचे बक्षिस मिळाले.

३. तुम्ही आजपर्यंत मुलांसोबत केलेल्या कोणत्याही एका कामाबद्दलची माहिती.
उदाहरणार्थ –
वयोगट  ८ ते १२
कोणत्या प्रकारचे काम केले आहे?
अथक या संस्थेमार्फत पुण्यातील झोपडपट्टीमध्ये चालवण्यात येणाऱ्या संध्याकाळच्या वर्गांमध्ये शिकवण्याचा ४ महिन्यांचा अनुभव आहे. या वर्गांतील मुलांना गोष्टी वाचून दाखवणे त्यांच्याकडून कथांचे नाटक करवून घेणे या प्रकारचे काम केले आहे. या मुलांसाठी ७ दिवसांच्या उन्हाळी शिबिराचे नियोजन करण्यात माझा सहभाग होता.

४.  तुम्हाला गोष्टरंग या कार्यक्रमात का सहभागी व्हायचे आहे? (जास्तीत जास्त 300 शब्दात लिहा.)

५ . दिलेल्या उताऱ्यांपैकी कोणत्याही एका उताऱ्याच्या सादरीकरणाचे विडिओ रेकॉर्डिंग करून YouTube वर अपलोड करून त्याची लिंक तयार ठेवा.  उताऱ्याची PDF download करायला इथे क्लिक करा.
लक्षात ठेवा, हे सादरीकरण आहे. त्यामुळे त्याचा नाट्यानुभव मिळणं महत्त्वाचं आहे. त्यातून तुमचं अभिनयकौशल्य अधोरेखित झालं पाहिजे.तुमची पुढच्या फेरीमध्ये निवड होण्यासाठी हे खूप महत्त्वाचं आहे.
६ . कार्यक्रमासाठी तुमची शिफारस करू शकणाऱ्या दोन व्यक्तींची नावे, मोबाईल नंबर, ईमेल-आयडी तयार ठेवा.

वरील सर्व मुद्द्यांची पूर्तता झालेली असल्यास आता तुम्ही हा फॉर्म भरण्यासाठी खाली क्लिक करा. शुभेच्छा !