निकाल

अंतिम फेरीसाठी निवड झालेल्यांची नावे खालील प्रमाणे आहेत.

ऋषिकेश सुगंधा सुदेश प्रधान, ठाणे
दर्शन दिलीप कुलकर्णी, पुणे
विकास रमेश कांबळे, सातारा
रूचीर अशोक हिवरेकर, मुंबई
प्रथम संजय रंजिता वाटांबळे, ठाणे
हर्षला राजेश शर्मा, जळगाव
अंकिता किशोर मुसळे, नाशिक
देवदास नंदकिशोर उचले, सिंधुदुर्ग
दामिनी राजेंद्र जाधव, नाशिक
योगेश्वर बेंद्रे, ठाणे
गजानन अशोक जाधव, औरंगाबाद
एरिएडन गोम्स, गोवा (उत्तर)
अभिषेक मिलिंद कुलकर्णी, कोल्हापूर
राजेश पुरुषोत्तम सोयाम, यवतमाळ
पुष्पक मधुकर भट, नागपूर
मयूर सरकाळे, पुणे
वैष्णवी सुरेशराव मुळे, बीड

अंतिम फेरीसाठी काही महत्त्वाचे मुद्दे

१. तुम्हाला खर्डी रेल्वे स्टेशनला २७ मे २०२३ रोजी सकाळी ०८:०० वाजता पोहोचायचे आहे. तिथून तुम्हाला QUEST सोनाळे येथे जायला गाडीची व्यवस्था असेल. प्रवासासाठी अजून कुठलीही सोय तिथे नाही याची कृपया नोंद घ्यावी.
२. दोन दिवसीय निवासी अंतिम फेरी सकाळी ११ वाजता सुरू होईल. कार्यशाळा आणि वैयक्तिक मुलाखती असे याचे स्वरूप असेल.
३. पाण्याची बाटली, नॅपकिन आणि कार्यशाळेसाठी साजेसे कपडे सोबत असणे गरजेचे आहे.
४. येताना २ शिफारस पत्र आणायची आहेत. (ज्यांची नावे तुम्ही फॉर्ममध्ये दिली आहेत त्यांचीच.)
५. तुमची राहण्याची आणि जेवणाची सोय, गावातच घरा-घरातून केलेली असेल.
६. खर्डी ते सोनाळे आणि परत खर्डी असा प्रवासखर्च, २ दिवसांची निवासाची सोय आणि जेवण-नाश्ता, या शिवाय कुठलाही खर्च संस्था करणार नाही.
७. कार्यशाळा २८ मे २०२३ रोजी दुपारी ३ वाजता संपेल, आणि साधारण ४:३० पर्यंत तुम्ही परत खर्डी स्टेशनवर असाल.
८. परीक्षकांचा निर्णय अंतिम असेल, त्यावर कुठलीही चर्चा होणार नाही.